वर्दीचा खून

media-20160902 (3)      मुंबईमध्ये वाहतूक विभागाचे पोलिस हवालदार विलास शिंदे यांच्यावर दोन मुस्लिम युवकांनी हल्ला केला. गेले १० दिवस ते लीलावती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. अखेर काल ३१ ऑगस्ट रोजी रात्री त्यांचे दुःखद निधन झाले. याला दुःखद निधन तरी कसे म्हणायचे? हा तर त्या मुस्लिम माथेफिरुंनी केलेला खूनच म्हणायला हवा. हल्ल्याचे कारण काय तर सदर मुस्लिम हल्लेखोराने हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळे हवालदार शिंदे यांनी त्याला अडवले, त्याचा राग मनात धरून त्याने त्याच्या भावाला फोन करून बोलावले. तो आला, येतानाच हातात दांडके घेऊन आला आणि त्याने शिंदे यांच्यावर जबर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. कायद्याचे राज्य म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात जानेवारी २०१६ ते जून २०१६ अखेर पर्यंत एकट्या मुंबईत पोलिसांच्यावर एकूण १८० हल्ले झाल्याचे रात्री Z २४ तासवर सांगण्यात आले. वास्तविक विलास शिंदे यांची काय चूक होती? दुचाकी वापरणारांना केलेली हेल्मेट सक्ती ही त्यांच्या फायद्याचीच आहे. पण त्या हरामखोराच्या जीवाची काळजी घ्यायला शिंदे गेले आणि त्याने त्यांचाच जीव घेतला.* अशा नराधमांना ताबडतोब फाशी द्यायला हवी. गेले कित्येक वर्षे बलात्कार करून खून करण्याचे गुन्हे घडत आहेत. आरोपी पकडले जाताहेत केस चालू राहते. त्याचा निकाल लागायला १०-१५ वर्षे लागतात. तोपर्यंत इकडे देशाच्या कानाकोपऱ्यात हजारो बलात्कार आणि खून होतात. निर्भया बलात्कार आणि हत्येच्या वेळीही जनतेत प्रचंड संताप होता. कोपर्डी बलात्कार असो अगर आता विलास शिंदे यांचा खून असो जनतेच्या भावना तीव्र आहेत हे सरकारने लक्षात घ्यावे. जनता ज्यावेळी म्हणते की अशा नराधमांना ताबडतोब फाशी द्या. त्यावेळी जनतेच्या भावना किती तीव्र आहेत हे सरकारला जाणवायला हवे. प्रत्येकवेळी घटनेची पानं तोंडावर फेकून तुम्ही असे जनतेचे तोंड नाही बंद करू शकत. घटना, कायदा लोकांच्यासाठी आहे लोकं घटनेसाठी अथवा कायद्यासाठी नाहीत.

IMG-20160902-WA0004कोपर्डी बलात्कार असो अगर विलास शिंदे यांची हत्या असो गुन्हेगार पकडले गेले आहेत. त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. आता कायद्याचा खिस काढून सिद्ध करण्यासारखे काही राहिले नाही. असे असताना मग कारण नसताना त्यांना १०-१५ वर्षे कशाला पोसत बसायचे? लगेच कोर्टात उभे करून एका तारखेत केस निकालात काढायला हवी. या घटना अजनातेपणे घडलेल्या नाहीत. जाणून-बुजून त्यांनी हे कृत्य केलेले आहे. पण म्हणतात ना बुद्धी आणि भावना यांचा मेळ या जगात कधी बसत नाही. भावना मारून कायम नाईलाजाने का होईना पण बुद्धीला वाव द्यावा लागतो. कारण लगेच फाशी द्या म्हटले की बुद्धिवंत घटना दाखवतात. काही बुद्धिवाद्यांना हा विचार बालिशपणाचे वाटेल पण तो त्यांच्या विचारसरणीचा दोष आहे. गुन्हा घडल्यानंतर दोन दिवसात जर फाशी दिली ना तर मग बघा साधा सिग्नल तोडण्याची सुद्धा कुणाची हिंमत होणार नाही. घटनेत जर काही गोष्टी बसत नसतील तर त्या पद्धतीने घटनेत दुरुस्ती होऊ शकते. यापूर्वीही अनेकदा राजकीय लोकांनी त्यांच्या फायद्यासाठी अशा दुरुस्त्या केल्या आहेत. मग जनतेच्या हितासाठी दुरुस्ती करावी लागत असेल तर करायला हरकत नसावी. यानिमित्ताने पोलिस दलातील अनेक समस्या चव्हाट्यावर असल्या आहेत. राज्यात पोलिस ठाणी, पोलिस चौक्या व्यवस्थित नाहीत. तिथे पोलिसांना सोयी-सुविधा नाहीत. अनेक पोलिस चौक्यांतून बाथरूमची सोय नाही. महिला पोलिसांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोली नाही. वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिशय हीन दर्जाची वागणूक देतात. त्यांना त्यांच्या घरच्या कामासाठी राबवतात. मुलांना शाळेत सोडणे, घरी बाजार आणून द्यायला लावणे अशी कामं त्यांना वरिष्ठांच्या दबावात करावी लागतात. हे प्रकार तातडीने बंद व्हायला हवेत. शहरात सरकारने CCTV लावायला हवेत. वाहतूक पोलिसांच्याकडे शस्त्र द्यायला हवीत. पोलिसांना कायमस्वरूपी घरे द्यायला हवीत. आयुष्यभर पोलिस सेवा केल्यावर निवृत्त होताना त्यांचे घर काढून घेतले जाते. मग म्हातारपणी त्यांनी कुठे जायचे? मुंबई सारख्या ठिकाणी त्यांना मिळत असलेल्या तुटपुंज्या पगारात प्रपंच चालवून मुलांचे शिक्षण भागवून एवढ्या महागाईच्या काळात घर घेणे हे त्यांच्या आवाक्यात आहे का? पोलिसांचे पगारही वाढवायला हवेत. मनसेप्रमुख मा. राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या ब्लू-प्रिंट मध्ये आश्वासन दिले होते की जर मनसेला पूर्ण बहुमतात सत्ता मिळाली तर आम्ही पोलिसांना कायमस्वरूपी घरे देऊ. सत्ता त्यांना मिळाली नाही हा भाग वेगळा. पण हा महत्त्वाचा मुद्दा सर्व पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात अग्रक्रमाने घ्यायला हवा. काल विलास शिंदे यांचा मृत्यू झाला की आजही दुपारी बातमी आली की मुंबई मधेच एक वाहतूक पोलिस निंबाळकर यांना इम्तियाज खान नामक एका मुस्लिम दुचाकीस्वाराने उडवले. निंबाळकर यांनी त्याला गाडी थांबवण्यासाठी हात केला तर गाडी त्याने सरळ त्यांच्या अंगावर घातली. मग सांगा कायद्याची भीती नावाचा प्रकार राहिला आहे कुठे? परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांच्यावर टीका करणारांनी इथे हे लक्षात घ्यावे की विलास शिंदे यांना मारणारे ते दोन हरामखोर परप्रांतियांच आहेत. २००६ साली ते उत्तरप्रदेशातील आझमगढ येथून बसलेत आणि तेंव्हापासून ते मुंबईत राहत आहेत. हेच ते गरीब-बिचारे पोट भरायला आलेले बघा त्यांचे कर्तृत्त्व काय आहे? आता कुठं त्या मानवाधिकार संघटना झक मारताहेत?* राज्यात काय चालले आहे दिसत नाही का त्यांना?

media-20160902 (2)काही वर्षांपूर्वी भिवंडी मध्ये दोन पोलिसांना जिवंत जाळण्यात आले ते ही मुस्लिमच होते. काय झाले पुढे त्यांचे? सापडले का? आझाद मैदानावर शहिद स्मारक तोडणारे, महिला पोलिसांच्या कपड्यांना हात घालणारे ते बांडगुळ कुठे आहेत? काय झाली त्यांना शिक्षा? आज जर विलास शिंदे यांच्या ठिकाणी जर कोणी मुस्लिम हवालदार असता आणि त्याला मारणारा कोणी हिंदू असता तर सगळे पुरोगामी आणि सेक्युलर रस्त्यावर उतरले असते. मुंब्र्यातला पवारसाहेबांचा मानसपुत्र रस्त्यावर नाचला असता. तर स्वतःला राजकीय विश्लेषक समजणारे टीव्हीवर बसून चिवचिव करणारे मिस्वाक पेस्टने दात घासून हिंदूंच्या विरोधात टीव्हीवर चूळा भरत बसले असते. पण आता सगळ्यांच्या घशात हाडूक अडकलेय कोणीही बोलायला तयार नाही. काही वर्षांपूर्वी पठाण नावाच्या मुस्लिम पोलिस कर्मचाऱ्याला शिवजयंतीच्या वेळी मारहाण झाली तेंव्हा एम. आय. एम. नावाच्या पक्षाने तिथे मोर्चे काढले, सभा घेतल्या. पोलिसांच्यावर हात टाकला म्हणून त्यांनी त्यावेळी प्रचंड टीका केली मग आता का गप्प आहेत? *भिवंडी, बेहरामपाडा, क्राफड मार्केट इथे पोलिसांची कारवाई करायची हिंमत होत नाही. मुस्लिमांच्या मतांच्यासाठी सरकार त्यांच्यातील गुन्हेगार वृत्तीच्या लोकांना हात लावत नाही. सगळे मुस्लिम तसे नाहीत हे १००% मान्य आहे पण जे तसे आहेत त्यांच्यावर तर कारवाई करा. कारवाई करताना त्याचा गुन्हा बघा. त्याचा धर्म आणि जात पाहू नका. पोलिसांच्यावर राजकीय दबाव टाकू नका. काही लोकांना विनाकारण पोलिस संरक्षण दिले गेले आहे त्याचा आढावा घेऊन गरज असेल तरच संरक्षण ठेवा. शाहरुखखान सारख्या पोलिसांवर हात उचालणाऱ्या नीच माणसाला कशासाठी पोलिस संरक्षण दिले आहे? आता जे काही घडते आहे ते खूप भयानक आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरात परप्रांतीयांची संख्या प्रचंड वाढली आहे. आज मुंबई मध्ये जे गुन्हे घडत आहेत त्यात बाहेरून आलेल्या गुन्हेगारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. शहराला बकाल स्वरूप आले आहे. जे काँग्रेस राष्ट्रवादीने केले तेच आता सेना- भाजपाही आता तेच करत आहेत. हिंदुत्त्वाच्या नावाखाली परप्रांतीयांना मिठ्या मारल्या जात आहेत. मिठाई पुरवली जात आहे. आगामी महापालिकेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून त्यांना कुरवाळण्याचे काम चालू झाले आहे. हे प्रकार अजून वाढत जातील. मुख्यमंत्र्यांच्यासह इतर अनेक नेते मोहल्ल्यात जातील भाषणं ठोकतील. कोपर्डी प्रकरण बरेच निवळले आहे तसेच आता विलास शिंदे प्रकरणही अजून चार-आठ दिवसात निवळेल. आत्तापर्यंत जे पोलिस ड्युटीवर असताना मारले गेले त्यांना सरकारने शहिदाचा दर्जा दिल्याचे जाहीर केले होते तो मिळाला की नाही हा संशोधनाचा विषय आहे. आर्थिक मदतही अनेकांच्या कुटुंबियांना अजून मिळाली नाही ती लवकर मिळावी. विलास शिंदे यांच्या कुटुंबियांनाही ती लवकर मिळावी. तसेच सरकारने असे कायदे करावेत की गुन्हा घडल्यानंतर ताबडतोब शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत. तरच या घटनांना पायबंद बसेल अन्यथा हे प्रकार आगामी काळात वाढतच जातील.

media-20160825 (1)
click on image to buy

किशोर बोराटे.

 नियमित नवीन लेखांंसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी आपला ई-मेल खाली टाईप करा आणि subscribe करा.

आपले मत व्यक्त करा