युद्ध करून पाकिस्तान खरेच सुधारेल?

काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते की एका युद्धाने पाकिस्तान सुधारेल असे वाटत नाही. ते पूर्ण विचार करून बोलले होते. कारण या आधी पाकिस्तान बरोबर आपले चार वेळा युद्ध झाले आहे. चारही युद्धात पाकिस्तानने सपाटून मार खाल्ला आहे. मोदी सरकारने पण एक सर्जिकल स्ट्राईक केला आहे. तरीही परत पुलवामा हल्ला झालाच. पुलवामा हल्ल्याबाबत फक्त एकट्या पाकिस्तानला जबाबदार धरून चालणार नाही. तर यात ते हरामखोर विभाजनवादी नेतेही तेवढेच जबाबदार आहेत जेवढे पाकिस्तान जबाबदार आहे. यांना प्रथम उडवायला हवे. काँग्रेसच्या धोरणांनी आणि विभाजनवादी नेत्यांनी काश्मिरी जनतेला आत्तापर्यंत हिंदुस्थानशी कधीही एकरूप होऊच दिले नाही. आझाद काश्मिरचा नारा ऐकतच तेथील मुलं जन्माला येताहेत आणि हिंदुस्थान मुर्दाबाद ऐकतच ती मोठी होताहेत. मग त्यांच्यात हा देश आपला आहे अशी भावना कशी जागृत होणार? काश्मिरमध्ये कलम ३७० असल्याने बिगर काश्मिरी व्यक्ती तेथे जाऊन एक इंच सुद्धा जमिन विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे कोणी उद्योजक तिथे जाऊन कारखाने, कंपन्या उभ्या करू शकत नाही. औद्योगिकीकरण नसल्याने काश्मिरी युवकांना रोजगार उपलब्ध होत नाहीत. शिक्षणाच्या नावाने बोंब चालू आहेच. तिथे प्रचंड गरिबी आहे. मग त्याचाच फायदा हे विभाजनवादी नेते, दहशतवादी घेताहेत. १०००-५०० रुपये दिले की मग हे पैशासाठी दगडी मारायला लगेच तयार होतात. दरवर्षी काश्मिरच्या सुरक्षेवर आपले ५०,००० करोड रुपये खर्च होताहेत. हिंदुस्थानच्या प्रगतीत काश्मिरींचे योगदान काय आहे? ते जे अन्न खातात ते सुद्धा हिंदुस्थानच्या विविध राज्यांतून आयात केले जात आहे. यांना कसले कर भरावे लागत नाहीत. यांना धान्य, वीज, पाणी सर्व काही आपल्यापेक्षा स्वस्त दरात भेटतेय.

काँग्रेसने तेथील पीडीपी, आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांना हाताशी धरून काश्मिरची वाट लावली. हे दोन्ही पक्ष म्हणजे विभाजनवादी नेत्यांच्या हातचे बाहुले आहेत. काश्मिर प्रशासनात याच विभाजनवाद्यांची पोरं अधिकारी, कर्मचारी आहेत. राज्य पोलिस दलात पण आहेत. त्यामुळे तेथील पोलिस हे कधीही लष्कराला सहकार्य करत नाहीत. हे पगार जरी सरकारचा घेत असले तरी चाकरी विभाजनवादी नेत्यांची आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांचीच करतात. यांच्या मर्जीच्या विरोधात जाणारांना ठार केले जाते. जसे की गेल्या काही महिन्यांपूर्वी पोलिस दलातील अनेक पोलिसांना दहशतवाद्यांनी मारून त्यांच्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. दहशतवाद जरी पाकिस्तान पुरस्कृत असला तरी त्याला काश्मिरात आश्रय हा विभाजनवादी नेत्यांच्याकडून आणि तेथील काही जनतेकडून दिला जात आहे. हे आपल्यातलेच हिरवे नाग प्रथम ठेचून काढायला हवेत. पाकिस्तान यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या जवानांच्यावर गोळ्या चालवत आहे. त्यामुळे पाकिस्तानचा बंदोबस्त तर करायलाच हवा पण या हिरव्या सापांना प्रथम ठेचायला हवे. पाकिस्तान दहशतवादी पाठवत आहेत आणि हे हिरवे साप त्यांना आश्रय देत आहेत.

विभाजनवादी नेते हे दुधारी शस्त्रासारखे आहेत. यांची मानसिकता ही पाकधार्जिनी आहे. ते पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवून आहेत. पाकिस्तान तिकडून दहशतवादी पाठवते आणि ही लोकं काश्मिरात पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देतात. पाकिस्तान बाहेरून हिंदुस्थानला लक्ष्य करत आहे. तर ही लोकं आत राहून देशाला पोखरत आहेत. यांचा प्रथम बंदोबस्त व्हायला हवा. मध्यंतरी NIA ने यांना ताब्यात घेऊन यांची चौकशी सुरू केली होती. त्या चौकशीत यांची एकेकाची १००, २००, ३०० करोडोंची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली होती. एवढी मालमत्ता यांनी कुठून कमावली? काश्मिरात ना कोणत्या कंपन्या आहेत, ना हे उद्योजक आहेत, ना यांचे कोणते मोठे व्यवसाय आहेत. परंतू या चौकशीचे पुढे काय झाले? संबंधित मालमत्तांचे काय झाले? हे कळले नाही.

आत्ता पुलवामा मधील हल्ल्यात आपले ४२ सैनिक शहीद झाले. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे सध्या देशात निवडणूकांचे वारे वाहत आहे या पार्श्वभूमीवर हा जो हल्ला झाला आहे त्याला या निवडणूकांची पण किनार आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून पाकिस्तानातील अतिरेकी संघटना सैरभैर झाल्या आहेत. त्यांचे म्होरके रोज उठून मोदींच्या विरोधात नरड्यात बोटं घालून उलट्या करत असतात. अशा पद्धतीने हल्ला करून एकप्रकारे मोदी सरकारला बदनाम करून भारतीय जनमत त्यांच्या विरोधात जावे असाही प्रयत्न यामाध्यमातून झाला असावा. पण त्यांची ही चाल त्यांच्यावरच उलटली. हल्ला झाल्यानंतर नेहमीप्रमाणेच देशभरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली आणि पंतप्रधान मोदी यांनी आता पाकिस्तानवर हल्ला करून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवावा अशी मागणी देशभरातून होऊ लागली. या हल्ल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षांच्या सह सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सरकारला पाठिंबा दिला आणि पाकिस्तानला धडा शिकवावा असे आवाहन केले. पंतप्रधानांनी पण त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी पुलवामा हल्ल्याचे जे दोन सूत्रधार होते ते गाझी आणि कामरान यांना आपल्या जवानांनी काश्मिरात ठार केले. हल्ला या दोघांनी घडवून आणला असला तरी हल्ल्याचे सूत्रधार सीमेपलिकडे आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार?

आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांनी सांगितले की पुलवामा हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानला जबाबदार धरून पाकिस्तानवर हल्ला करावा अशी हिंदुस्थानातून मागणी होत आहे. पण या हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे याचे कोणते पुरावे हिंदुस्थानकडे आहेत? आम्ही स्वतः दहशतवादाने त्रस्त आहोत. आत्तापर्यंत ७०,००० पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यात मारले आहेत. इथली परिस्थिती पूर्वीसारखी नाही. माझ्या सरकारचे ध्येय हे पाकिस्तानच्या सर्वसामान्य जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन देशाला विकासाच्या मार्गाने घेऊन जाण्याचे आहे. हिंदुस्थान बरोबर चर्चा करण्यास आम्ही केव्हाही तयार आहोत. हे सांगत असतानाच इम्रानने नेहमीप्रमाणेच काश्मिरचा राग आळवला हिंदुस्थानने लष्कराच्या बळावर काश्मिरींच्यावर अत्याचार करण्याचे थांबवावे. केवळ संशयाच्या आधारे तुम्ही हल्ल्याचे असे साहस केले तर आम्ही त्याला चोख उत्तर देऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे. पुलवामा घटनेवर भाष्य करताना आणि हिंदुस्थानकडे पुरावे मागताना इम्रान हे विसरतोय की जैश ए मोहम्मद या पाकिस्तान स्थित अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची उघडपणे जबाबदारी घेतली आहे. यापेक्षा अजून कोणता मोठा पुरावा इम्रानला हवा आहे? लष्कराच्या बळावर काश्मिरी लोकांच्यावर अत्याचार करू नका असा शहाणपणाचा सल्ला इम्रानने हिंदुस्थानला देण्याअगोदर बलुचिस्तान मध्ये पाकिस्तानी लष्कर बलोची जनतेवर कसे अत्याचार करत आहेत याची माहिती घ्यावी. त्यामुळे इम्रानने उगीच हिंदुस्थानच्या दिशेने नो बॉल टाकू नयेत. त्याचबरोबर पाकिस्तान बरोबर चर्चा करायची म्हणजे नक्की कुणाबरोबर चर्चा करायची हा ही प्रश्न हिंदुस्थान समोर आहे. इम्रान हा तर बाहुला आहे. तिथे सगळी सूत्र ही लष्कराकडे असतात. तिथे अनेक शक्ती कार्यरत आहेत. त्यात लष्कर, पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय, सरकार आणि दहशतवादी संघटना या चौघांची चार दिशांना तोंडं असतात. त्यांच्यात बिलकूल समन्वय नसतो. त्यामध्ये चर्चाही दोन देशातील सरकारमध्येच होऊ शकते. पण तिथले सरकार हे लष्कराच्या हातातले बाहुले आहे. हीच मोठी अडचण आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर देशातील जनता संतप्त आहे पाकिस्तानवर कारवाई करण्यासंदर्भात सरकारवर दबाव वाढत आहे. यात वावगे काही नाही. पंतप्रधानांनी पण जनभावनेची दखल घेतली आहे. पाकिस्तानवर काय कारवाई करायची? कोणती करायची? कोणत्या पद्धतीने करायची? कधी करायची? हा सर्वस्वी सरकारचा आणि लष्कराचा प्रश्न आहे. तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण थोडा विचार करू. पाकिस्तानवर हल्ला करायलाच हवा याबाबत कुणाचे दुमत नाही. तरीही प्रश्न असा उपस्थित होतो की समजा पाकिस्तानवर हल्ला करून तरी हा प्रश्न निकालात निघणार आहे का? कारण या अगोदर कारगिलसह आपली पाकिस्तान बरोबर ४ युद्ध झाली आहेत. चारही वेळी पाकिस्तानला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नंतर काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना धडा शिकवला. तरीही पाकिस्तानच्या कुरापती थांबल्या नाहीत. मग आत्ता हल्ला करून पाकिस्तान सुधारेल? मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सांगितले की एका लढाईने पाकिस्तान सुधारणारे नाही. ते अतिशय विचार करून बोलले आहेत. एका लढाईने पाकिस्तान सुधारणार नाही असे जेंव्हा पंतप्रधान म्हणतात तेंव्हा मग नक्की काय करायला हवे याबाबत त्यांच्याकडे निश्चितच काहीतरी प्लॅन असू शकतो. पुलवामा हल्ल्याचा बदला निश्चितपणे घेतला जाईल याबद्दल कुणाच्या मनात बिलकूल शंका असण्याचे कारण नाही. बाकी पाकिस्तान विरोधात पराराष्ट्रधोरण राबवून जगात पाकिस्तानचे devaluation करणे, त्यांची आर्थिक नाकेबंदी करणे, सिंधू नदीचे पाणी अडवणे, स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढणाऱ्या जनतेला बळ देणे. सिंध, पंजाब, पाक व्याप्त काश्मिर मधील काश्मिरींना सपोर्ट करणे, या घटना पाकिस्तानचे तुकडे करून त्यांना कमजोर करण्यास पुरेश्या आहेत. या बाबी सातत्याने होतच आहेत. ही एक long term process आहे. त्यात वेळ जाईल, पण या गोष्टी कराव्याच लागतील. युद्ध करून प्रश्न मिटणार नाही, पण काही काळ तरी दहशतवादापासून पाकिस्तान परावृत्त होईल आणि तेवढा काळ तरी आपल्याला सुख मिळेल. ही आशा करणे सुद्धा मूर्खपणाचे आहे तरीही आशा करूयात. बाकी काय ते सरकार आणि आपले सैन्यदल पाहून घेईल. त्यांना त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव आहे. पण कारवाई तर करावीच लागेल. नाहीतर मोदी आणि मनमोहन सिंग यांच्यात काही फरक नाही हे समजून जनतेचा मोदी यांच्यावरील विश्वास तर कमी होईलच पण त्यांच्या विरोधातील आक्रोश वाढत जाईल.

4 comments

 1. अगदी बरोबर आधी घर के भेदी संपवायला हवे .सोबत 370 कलम रद्द व्हायला हवी

 2. बरोबर आहे, प्रथम फुटिरतावाद्यांचा खात्मा झाला पाहिजे.

 3. बदला घेण्याचा सगळ्यात साधा मार्ग आहे कलम 370 रद्द करण्याचा
  कारण तो मुळावरच घाव असेल
  संसदेत बहुमत आहेच
  आता देश सगळा सरकारच्या पाठीशी आहे
  विशेष अधिवेशन बोलवून कलम रद्द होऊ शकत आणि आताच्या परिस्थितीत विरोधकांनी काही विपरीत भूमिका घेतलीच तर त्यांना कोणीही दारात देखील उभं करणार नाही
  गरज आहे हिम्मत दाखवण्याची
  त्या एका कलमामुळे काश्मीर वेगळं ठरतंय आणि हकनाक जवानांचे बळी जातायत
  अर्थात एवढी मोठी कारवाई सरकार करेल असं वाटत नाही त्यापेक्षा त्याच कलमाच्या मागे दडून नुसत्या डरकाळ्या फोडल्या जातील अन ते रद्द करण्यासाठी पुन्हा एकदा मते मागितली जातील

आपले मत व्यक्त करा