काँग्रेसचा DNA तपासायला हवा.

narayan

काँग्रेसचा DNA तपासायला हवा.

जलती हुई बिडी के साथ
बहोतसे राज जलाये है….
पूर्णिमा की रात क्या चली गयी
अमावास्या आई तो साले सब
भूत हाथ धो के पीछे पडे है.

इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची दहशतवादी असल्याची माहिती लपवण्यासाठी माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी प्रतिज्ञापत्रात बदल केले होते, असा गौप्यस्फोट माजी गृह सचिव जी के पिल्लई यांनी केल्यानंतर आता गृह खात्याच्या तत्कालीन उपसचिवांनी आणखी खळबळजनक दावा करून यूपीए सरकारच्या अडचणी वाढवल्या आहेत.
इशरत चकमक बनावट दाखवण्यासाठी विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख सतीश वर्मा यांनी आपला खूप छळ केला. ‘एसआयटी’च्या प्रमुखांनी सिगारेटने मला चटके दिले, असा धक्कादायक आरोप माजी उपसचिव आरव्हीएस मणी यांनी ‘टाइम्स नाउ’ला मुलाखतीत केला. सीबीआय अधिकाऱ्यांनी माझा पाठलाग केला. इशरत खटल्यातील पुरावे तयार करण्यात आले. दुसऱ्या प्रतिज्ञापत्रावर सही करण्याचा आदेश आपल्याला देण्यात आला. तसेच, गुजरात गुप्तहेर खात्यातील अधिकाऱ्यांना सूचित करण्याचे काम आपल्याकडून विशेष तपास पथकाला हवे होते, असंही त्यांनी सांगितलं. त्यावरून मंगळवारी संसदेत बराच गदारोळ झाला, तेव्हा काँग्रेसनं हे आरोप फेटाळले, तर भाजपनं चौकशीची मागणी लावून धरलीय.
* प्रकरण काय आहे?
इशरत3इशरत जहाँप्रकरणी तत्कालीन यूपीए सरकारने दोन प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. पहिल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते, ‘कथित बनावट इशरत चकमकीत मृत्युमुखी पडलेले इशरतसह चार जण दहशतवादी होते.’ केवळ दोन महिन्यांच्या आतच सरकारतर्फे दुसरे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. या प्रतिज्ञापत्रात सरकारने पूर्ण यू-टर्न घेतला होता. कथित बनावट चकमकीत मृत्युमुखी पडलेले दहशतवादीच होते, हे सिद्ध करण्याएवढे पुरावे नसल्याचे या दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. केंद्रीय गृहमंत्रालयातील माजी उपसचिव (अंतर्गत सुरक्षा) आरव्हीएस मणी यांची सही या दोन्ही प्रतिज्ञापत्रावर होती. आपला उपयोग तत्कालीन सरकारने ‘रबर स्टॅम्प’ म्हणून केल्याचा दावा मणी यांनी केला आहे.

जसजशी ही माहिती बाहेर येते आहे तस-तसा काँग्रेसचा क्रूरपणा दिसून येत आहे. मतांच्या लाचारीसाठी आणि एका कुटूंबाला खुश करण्यासाठी प्रशासन कसे वेठीस धरले जात होते त्याचा हा धडधडीत पुरावा आहे. देशाच्या सुरक्षेचे कसे धिंडवडे काढले जात होते ते यानिमित्ताने भारतीय जनतेला दिसून आले. या दोन अधिकाऱ्यांनी काँग्रेसचा निधर्मीवादी बुरखा यानिमित्ताने फाडला आहे. हा आरोप जर भाजपा सारख्या पक्षाने केला असता तर म्हणता आले असते की राजकीय हेतूने हा आरोप केला आहे. पण इथे प्रशासनातील दोन अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.


ADVERTISEMENT : BUY ONLINE INSPIRING BOOKS CLICK HERE BY DR. MANOHAR SASANE

ADVERTISE


 

इशरतचे नाव दहशतवादी म्हणून येऊ नये असे चिदंबरम व काँग्रेसला का वाटत होते? हे जे सर्व प्रकार झाले किंवा चिदंबरम यांनी केले याबाबत काँग्रेस आणि चिदंबरम यांना कोण आदेश देत होते? गृहमंत्री असलेले चिदंबरम आणि सत्ताधारी काँग्रेस पक्ष दहशतवाद्यांना का पाठीशी घालत होते? केवळ नरेंद्र मोदी व अमित शहा यांना अडकवण्यासाठी पाकिस्ताला सोयीस्कर भूमिका काँग्रेसने घेतली. इशरतचाच न्याय मग साध्वी प्रज्ञाला का लावत नाही? इशरत वरील आरोप सिद्ध झाले आहेत. डेव्हिड हेडली याने स्पष्टपणे इशरतचे नाव घेतले आहे. न्यायालयात इशरत दहशतवादी होती हे सिद्ध झाले आहे. तसे प्रज्ञाच्या बाबतीत अजून झाले नाही. तरी तिला मरण यातना भोगाव्या लागत आहेत. जो न्याय तुम्ही तिकडे लावताय तोच न्याय इकडे का नाही? प्रज्ञा मुसलमान नाही म्हणून तुम्ही तिच्याकडे बघायला तयार नाही. अहो इशरत वरील आरोप सिद्ध झाले. तरी तिचे आई- बाप आणि भाऊ होण्यासाठी स्पर्धा लागली आहे आणि जिच्यावरील आरोप अजून सिद्ध व्हायचे आहेत तिला फासावर देण्यासाठी कित्येकजण आतूर आहेत. कसला न्याय हा? किती विरोधाभास आहे हा? इथे अफझल गुरुच्या समर्थनार्थ नारेबाजी होते. याकुब मेमनसाठी रात्रीचे कोर्ट उघडले जाते. पण प्रज्ञाला मरण यातना भोगायला लावलेत. तिच्यासाठी कोर्टात कोणी धाव घेत नाही. “इन्कलाब झिंदाबाद” म्हणत फासावर गेलेल्या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या क्रांतिवीरांच्या आत्म्याला काय वाटत असेल? जेंव्हा त्यांच्या देशात अफझल गुरू झिंदाबादचे नारे दिले जातात हे ऐकून त्यांचा आत्मा नक्कीच तडफडत असेल. हा त्यांच्या हौतातम्याचा अपमान आहे.

इशरत2
इशरतच्या बाबतीत चिदंबरम आणि काँग्रेसने जे केले ती फक्त त्यांची चूकच नाही तर हा चक्क देशद्रोह आहे. कोर्टात सिद्ध होवो अगर न होवो पण जनतेच्या कोर्टात तरी हा देशद्रोहच आहे आणि याची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी. त्यांचे कृत्य म्हणजे सीमेवरील सैनिकांचा तसेच देशाखातर शहीद झालेल्या सैनिकांचा अपमान आहे. काँग्रेसचा DNA नक्की नक्की तपासावा लागेल. काँग्रेस कुणासाठी काम करतेय याचा जाब विचारण्याची वेळ त्यांना आली आहे. जे काही घडले त्याचे उत्तरदायित्व त्यांनी स्विकारावेच लागेल. भारतीय जनता सहिष्णू आहे म्हणून हे सुरक्षित फिरू शकतात नाहीतर दुसऱ्या देशात असते तर यांनी पळवून-पळवून मारले असते. जनता सहिष्णू असली तरी उद्या एखाद्या सैनिकाचे किंवा पोलिसाचे डोके फिरले तर जो यांच्या ब्वाडीला सुरक्षा देतोय तोच यांनी गोळ्या घालेल सांगता येत नाही. इंदिरा गांधींचे उदा. डोळ्यापुढे आहे. त्यामुळे संबंधितांनी जपून राहावे हेच चांगले. मोदी सरकारने या प्रकरणाचा छडा लावून संबंधित व्यक्ती दोषी असेल त्यांना ती किती मोठी आहे हे न पाहता त्याचा गुन्हा किती मोठा आहे हे पाहावे आणि त्यांना जास्तीत-जास्त शिक्षा करावी. धन्यवाद.

जयहिंद, जय महाराष्ट्र

किशोर बोराटे.

आपले मत व्यक्त करा