स्मृति क्षेपणास्त्रापुढे विरोधक निष्प्रभ

IMG-20160226-WA0016संसदेचे अधिवेशन चालू झाले आहे. रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणि जे एन यू प्रकरणी विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली होती. राहुल गांधींनीही अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सरकार माझ्या भाषणांना घाबरते असे सांगून नव्या वर्षातील आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या विनोदाचे पारितोषिक आपल्या खात्यावर जमा करून घेतले. एकंदर संसदेत तुंबळ युद्ध पाहायला मिळेल असे वाटत होते आणि विरोधकही त्याच तोऱ्यात आले होते, पण सरकारला घेरण्याची विरोधक तयारी करत असतानाच अचानक सरकारने स्मृती क्षेपणास्त्र विरोधकांच्यावर सोडले. स्मृती क्षेपणास्त्राने विरोधकांचा असा काही विध्वंस केला की त्यांची पळताभुई थोडी झाली. स्मृती इराणी यांनी विरोधकांना सावरण्याची बिलकूल संधीच दिली नाही. विरोधकांना स्वप्नात सुद्धा वाटले नसेल की अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपली लक्तरे संसदेच्या वेशीवर अशा पद्धतीने टांगली जातील. स्मृती इराणी बोलत असताना विरोधक मुकाट्याने ऐकून घेत होते. त्यांना उत्तर द्यायला “क” च्या बाराखडीतील एकही शब्द आठवत नव्हता. अतिशयोक्ती नाही पण विरोधी बाकावर जाऊन जर मायावती, ज्योतिरादित्य किंवा राहुल यांना अचानक त्यांचे नाव जरी विचारले असते तरी त्यांना ते आठवून सांगावे लागले असते. इतकी त्यांची स्मृती गुंग झाली होती. स्मृती इराणी यांनी जी क्षेपणास्त्रे सोडली त्याने घायाळ झालेल्या विरोधकांना अनुराग ठाकूर यांनी थेट ICU मध्येच पोहचवले. अधिवेशनाचा पहिला दिवस या दोघांनी असा गाजवला की संपूर्ण अधिवेशनात विरोधकांना तोंड वर काढायची संधी मिळेल असे काही वाटत नाही.

click here to buy

अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी आलेल्या विरोधकांची आपसातच एकी नव्हती. राहुल असेल मायावती, ज्योतिरादित्य यांनी कुणीही व्यवस्थित अभ्यास केला नव्हता. ज्या अफजल गुरूवरून JNU मध्ये एवढा राडा झाला, त्यावर ज्यावेळी ज्योतिरादित्य बोलायला उठले काय बोलले कन्हैया निर्दोष आहे. त्याला विनाकारण अडकवले आहे. विनाकारण कसे अडकवले? सगळ्या भारताने त्याला त्या कार्यक्रमात भाषण करताना घोषणा देताना पहिले आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याने दिल्ली पोलिसांच्यापुढे कबूली जबाब दिला आहे की तो त्या कार्यक्रमाचा आयोजक होता आणि देशविरोधी घोषणा दिल्या. दिल्ली पोलिसांकडे तसे पुरावे आहेत. देशविरोधी घटना घडत असताना राहुल आणि ज्योतिरादित्य त्याचे समर्थन करतात ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. ज्या संसदेने जाज्वल्य देशप्रेमाची भाषणे ऐकली त्या संसदेत आज देशद्रोह्यांचे समर्थन केले जात आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, लालकृष्ण आडवाणी, यशवंतराव चव्हाण यांची अभ्यासपूर्ण भाषणे ऐकली त्या संसदेची आज काय अवस्था होऊन बसली आहे? ज्योतिरादित्य यांना खरे तर जनता हुशार समजत होती पण त्यांनीही दाखवून दिले की मी ही राहुल गांधी यांचाच भाऊ आहे. त्याही पुढे जाऊन त्यांनी वक्तव्य केले की देशद्रोही घोषणा दिल्या म्हणजे कोणी देशद्रोही होत नाही. राहुल गांधी म्हणतात सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दाबतेय. चिदंबरम म्हणतात अफजलच्या बाबतीत चूक झाली. म्हणजे काँग्रेसला नक्की म्हणायचेय काय? देशभक्त आणि देशद्रोह यातला फरक काँग्रेसला समजत नाही का?
rahul“अफझल गुरू अमर रहे”, “भारत की बरबादी तक ये जंग जारी रहेगी”, “पाकिस्तान झिंदाबाद” “हमें आझादी चाहिये, “अफझल हम शर्मिन्दा है तेरे कातिल जिंदा है” “हिंदुस्थान मुर्दाबाद” या अशा देशविरोधी घोषणा हा जर देशद्रोह होत नसेल तर काँग्रेसने आणि ज्योतिरादित्य यांनी देशाला देशद्रोहाची व्याख्या सांगावी. याच हरामखोरांच्या मांडीला-मांडी लावून राहुल बसतात आणि म्हणतात की विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जातोय. राहुलजी यांचा फक्त आवाजच नाही तर नरडं दाबलं पाहिजे. “हर घर में अफझल पैदा करेंगे” म्हणणारे पोलीस कारवाईच्या भीतीने JNU च्या बिळात जाऊन दडले. अशा देशद्रोह्यांचे समर्थन करताना शरम वाटायला हवी. गेली १५ वर्षे झाले काँग्रेस मोदी यांच्याशी लढते आहे. गुजरातच्या ३ निवडणूका झाल्या, लोकसभेची निवडणूक झाली. सगळीकडे काँग्रेसला सपाटून मार खावा लागला, पण आजही मोदी यांच्याशी दोन हात कसे करावेत हे काँग्रेसच्या लक्षात येत नाही. मोदींना विरोध करण्याच्या नादात काँग्रेस चुकांवर चुका करत जातेय. त्या चुकाही अक्षम्य आहेत. मोदींना विरोध करण्यासाठी देशद्रोही लोकांना सपोर्ट करणे यात राजकीय चातुर्य काय आहे? शहाणपणा काय आहे? आणि बुद्धिमत्ता तरी काय आहे? फक्त हिंदुत्वाचे ढोल बडवत भाजपा आणि संघाच्या नावाने शिमगा करायचा हाच यांचा अजेंडा. रोहित वेमुलाने आत्महत्या केली त्यात सुद्धा मायावती जातीचं कार्ड खेळतात. रोहित वेमुलाच्या आत्महतेप्रकरणी जी चौकशी समिती नेमली आहे त्या समितीत दलित सदस्याला घेतले आहे का? हा प्रश्न त्यांनी भर संसदेत स्मृती इराणींना विचारला. स्वतः प्रत्येक ठिकाणी जात बघायची आणि दुसऱ्याला जातीयवादी म्हणून चिडवायचे. जरा तरी शरम वाटायला पाहिजे. कसला हा हलकटपणा? JNU प्रकरणी हे लोकं भाजपा आणि अभाविप वर आरोप करतात की ज्या व्हिडिओ क्लिप्स आहेत त्या डुप्लिकेट बनवल्या आहेत. कन्हैया, खालिद यांनी देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत. पण पोलिसांनी त्या चेक करून घेतल्या आहेत. त्या खऱ्या आहेत. स्वतः JNU प्रशासनाने जी चौकशी केली त्यांचाही अहवाल त्यांनी सादर केला आहे की त्यावेळी स्वतः खालिद, कन्हैया, अनिर्बंध व त्यांचे साथीदार यांनी देशविरोधी घोषणा दिल्या आहेत. हा अहवाल सरकारचा किंवा दिल्ली पोलिसांचा नाहीतर JNU प्रशासनाचा आहे. त्यावर तरी विरोधकांनी विश्वास ठेवावा. पण प्रश्न अशी निर्माण होतो की ज्या देशद्रोह्याला फाशीची शिक्षा झाली आहे त्याच्या नावाने कार्यक्रम करायला JNU प्रशासनाने परवानगी दिली कशी? त्या कार्यक्रमात चेहरा गुंडाळून काही बाहेरची लोकंही सामील झाल्याचे सांगण्यात येते. प्रश्न असा निर्माण होतो की जिथे कॅम्पसमध्ये पोलिसांना जायला परवानगी नाही तिथे ही बाहेरची लोकं आत कशी आली? ज्या अफजल गुरूला काँग्रेसच्या काळात फाशी दिली गेली आणि ज्या चिदंबरम यांनी स्वतः गृहमंत्री असताना राष्ट्रपती यांना अफझल गुरू याची दया याचिका फेटाळण्याची विनंती केली तेच चिदंबरम आज म्हणताहेत की अफझलच्या बाबतीत निर्णय घ्यायला घाई झाली याचा अर्थ काय होतो? हे वक्तव्य सर्वसाधारण नाही कारण चिदंबरम हे माजी गृहमंत्री आहेत. ते न्यायालयाच्या विरोधात मत नोंदवून घटनेचा आणि न्यायालयाचा अवमान करत आहेत. मतांसाठी कोण किती लाचार होईल हे नाही सांगता येणार? काँग्रेसने जनमताचा अंदाज घ्यावा. वारं कोणत्या दिशेनं वाहत आहे हे लक्षात घ्यावं. काँग्रेसची आज जी अवस्था झाली आहे ती का झाली आहे याचे आत्मपरीक्षण काँग्रेसवाले करत नाहीत. मुस्लिमांचे लांगूलचालन आणि हिंदूंची गळचेपी यामुळे काँग्रेस हरली आहे. काँग्रेसचा पूर्वीपासूनचा जो अजेंडा होता तो आता चालत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी तो बदलायला हवा. पण त्यांची ती मानसिकता नाही. JNU असेल, रोहित वेमुला असेल नाहीतर अफजल गुरू किंवा याकुब मेमन असेल देशद्रोही लोकांना सपोर्ट करणे हाच काँग्रेसचा अजेंडा राहिला आहे. हाफिज सईद याने हजारो भारतीय लोकांचा जीव घेतला आहे आणि भारताचा १ नंबरचा शत्रू असलेल्या व्यक्तीचा उल्लेख काँग्रेसचे नेते हाफिज सईद साहेब असा करतात मग जनता हे कसे सहन करणार? ही पिढी सुशिक्षित आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात काहीही लपून राहत नाही. जमाना बदलला आहे काँग्रेसनेही बदलायला हवे, नाहीतर त्यांचा अंत निश्चित आहे. स्वतंत्र तेलंगणा निर्मितीसाठी जे आंदोलन झाले त्यात ६०० लोकांचे प्राण गेले, पण तिथे राहुल गेले नाहीत. रोहित वेमुलासाठी मात्र हैदराबाद येथे दोन वेळा गेले. JNU मध्ये गेले. कधी कोणत्या शहीद जवानांच्या घरी गेले नाहीत. हे लोकांना कळत नाही का? मोदी देशप्रेमी आहेत म्हणून त्यांना विरोध करण्यासाठी म्हणून स्वतःची इमेज देशद्रोही बनवायची म्हणजे मूर्खपणा आहे. हे काँग्रेसने लक्षात घ्यावे. इथूनपुढे हिंदू असो मुस्लिम असो किंवा कोणीही असो सर्वांना विचारात घेऊनच राजकारण करावे लागणार आहे. मोदी यांनी हजार वेळा सांगितले आहे की मी १२५ कोटी जनतेच्या विकासासाठी काम करतोय आणि सरकार हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेनुसारच चालत आहे आणि इथूनपुढेही चालणार आहे. तरीही काँग्रेस आणि इतर मोदी विरोधक कायम मुस्लिम आणि दलित समाजाला हिंदूत्त्व, ब्राम्हणशाही, संघाचे विचार यांची भीती दाखवून त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण करत आहे. पण त्याला जनता आता भुलणार नाही. मुस्लिम आणि दलित समाजामध्येही जागृती झाली आहे. फक्त काँगेसमध्ये व्हायची बाकी आहे ती त्यांनी करावी. खरोखर हिंदूत्त्ववाद कशाला म्हणतात हे देशात किती लोकांना माहिती आहे? जे भीती घालतात त्यांनाही नीट माहिती नाही आणि जे भितात त्यांनाही नीट माहिती नाही. फक्त तिथे भूत आहे असे म्हटले की सगळे जण आपले तिथे अंडे-रोट ठेवायला लागले अरे पण भूत बघितले आहे कुणी? उगीच साप-साप म्हणून भुई थोपटण्याचा प्रकार चालू आहे.

किशोर बोराटे.

आपले मत व्यक्त करा