ओवेसी बंधू

भारतासारख्या जगातल्या मोठ्या लोकशाही देशामध्ये आणि जेथे वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोकं एकत्र राहतात आणि त्यांच्यामध्ये लोकशाहीची मूल्ये खोलवर रूजलेली असताना अशा लोकांचे नेतृत्व करायचे असेल तर ते नेतृत्वही व्यापक दृष्टिकोन असलेले हवे. एखाद्या जाती किंवा धर्माच्या लोकांचा भावनात्मक पाठिंबा घेऊन राजकारण करणे हा पर्याय तितकासा यशस्वी झाल्याचे दिसत नाही त्याचे तात्कालिक फायदे मिळतात आणि ते तेवढ्यापुरतेच असतात परंतू त्याचा आधार घेऊन व्यापक राजकारण करता येत नाही आणि त्याला समाजमान्यताही मिळत नाही एखाद्या जाती आणि धर्माचे नाव घेऊन राजकारण करायचे म्हणजे त्याला त्या राजकारणाला मर्यादा येतात त्याला तेवढ्यापुरती प्रसिद्धी मिळवून स्वतःचा टीआरपी वाढवता येतो परंतू तो क्षणिक असतो ही गोष्ट ओवेसी बंधू जेवढ्या लवकर समजून घेतील तेवढे त्यांच्या दृष्टीने ते फायद्याचे आहे कारण इथे राजकारण करताना तुमची ताकद ही फक्त तोंडात असून चालत नाही तर ती मतपेटीतून दिसली पाहिजे तरच त्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब होते आणि त्यासाठी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते कारण वोटींग मशीनचे बटन दाबणारी बोटं ही वेगवेगळ्या जाती-धर्माची असतात आणि ते तुमच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब करतात संख्येने एवढ्या मोठ्या मुस्लिम समाजातून एखादे सर्वसमावेशक नेतृत्व तयार OWAISIहोऊ नये ही खरेतर शोकांतिकाच आहे असं का घडलं याचे कुठेतरी चिंतन व्हायला हवं. नेतृत्व असं हवं की त्या समाजाला ते प्रवाहात घेऊन आले पाहिजे.
ओवेसी बंधूंना खरतर आता तशी चांगली संधी आहे मुस्लिम समुदायामध्ये जी नेतृत्वाची राजकीय पोकळी (political space)निर्माण झाली आहे ती भरून काढण्याची परंतू हे त्यांच्या लक्षात येत नाही कारण क्षणिक प्रसिद्धीसाठी आणि राजकीय लाभासाठी ते स्वतःचे आणि मुस्लिम समुदायाचे अतोनात राजकीय नुकसान करताहेत. प्रवाहातून बाजूला पडलेल्या आपल्या समाजाला मूळ प्रवाहात आणून त्यांना राजकीय वैचारिक आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या प्रगल्भ बनवणे सुशिक्षित आणि जागरूक बनवने या गोष्टींना महत्त्व द्यायचे सोडून ते स्वस्तातली प्रसिद्धी मिळवण्याचा विनाकारण खटाटोप करताहेत इथं कोणत्याही एका धर्माचा विचार रूजु शकत नाही मग तो धर्म हिंदू-मुस्लिम-बौध्द कोणताही असो हिंदुत्ववादी भूमिका घेणार्या भाजपानेही आपली सत्तेसाठी आपल्या सगळ्या तत्वांना मुरड घातली आणि सर्वसमावेशक (सब का साथ सबका विकास) राजकारणाची कास धरली. हे ओवेसी बंधूंनी लक्षात घेऊन फक्त मुस्लिम समुदायाचे नेते म्हणवून घेण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा सर्वसमावेशक करावी जी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केली आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातून कागल येथून निवडून येतात गेली कित्येक वर्ष ते कोल्हापूरचे नेतृत्व करताहेत बर तिथे मुस्लिम समाज बहुसंख्य आहे असे आजिबात नाही उलट नगण्य आहे त्यांना मतदान करणारा मतदार हा बहुसंख्य हिंदूच आहे आणि त्यांनीही मुस्लिम समाजाचा नेता अशी आपली प्रतिमा निर्माण केली नाही ओवेसी बंधू मुस्लिम समाजाला मूळ प्रवाहाबाहेर घेऊन जाताहेत बौध्द समाजाच्या नेत्यांनी जसं जातीचे राजकारण करून बौध्द समाजाच्या मतांची सौदेबाजी करून स्वतःच्या तुंबड्या भरुन घेतल्या स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी बौध्द समाजाला त्यांनी इतर पक्षांच्या दावणीला बांधले आज पाहिले तर तुलनेने एवढा मोठा असणारा हा समाज आणि त्यांचे नेते पूर्णपणे विस्कळीत झालेले आहेत मुस्लिम आणि बौध्द समाजाला योग्य दिशा देणारे नेतृत्वच मिळाले नाही या दोन्ही समुदायाचे सगळ्यात जास्त नुकसान हे त्यांच्या नेत्यांनी आणि देशावर सगळ्यात जास्त काळ राज्य करणार्या काँग्रेसने केले कायम त्यांना हिंदुत्ववाद्यांची भिती दाखवून स्वतःच्या दावणीला बांधून त्यांचा फक्त मतांच्यासाठी वापर करून घेतला. बौध्द समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लिम समाजाला इस्लाम याच्यातच गुरफटवून ठेवण्यात आले त्याच्या पलिकडच्या जगाची ओळख त्यांना करून देण्यात आलीच नाही कायम त्यांना कल्पनेच्या जगातच रमवले गेले त्यांनी जे चश्मे दिले त्यातूनच त्यांना बघायला लावले वास्तवाशी त्यांचा कधी संबंधच येऊ दिला नाही. आणि ओवेसी बंधूही तोच कित्ता पुढे गिरवू पाहताहेत स्वतःच्या राजकीय लाभासाठी ते हिंदू-मुस्लिम यांच्यात दरी निर्माण करताहेत त्यांच्यामुळे एकत्र नांदत असलेल्या या दोन समुदायामध्ये विनाकारण द्वेष निर्माण होतोय भारताला इस्लामी राष्ट्र बनवणे किंवा १५ मि. करोडो हिंदूंची कत्तल करतो म्हणणे या अशा पुड्या सोडून तात्पुरती प्रसिद्धी मिळते बाकी काही नाही या गोष्टी प्रॅक्टीकली कधीही शक्य होणार नाहीत हे त्यांनाही माहिती आहे यातून काय होणारे तर मतांचे ध्रुवीकरण याच्यापलिकडे काही नाही हिंदू भाजपाकडे तर मुस्लिम आणि बौध्द काँग्रेसकडे जाती-धर्मामध्ये तेढ वाढवून कोणीही सुखी होत नाही हे आपण पाहिले अनुभवले आहे शेजारी पाकिस्तानची काय अवस्था आहे शिया-सुन्नी वादामुळे पाकिस्तान कायम धुमसतेच आहे आता ओवेसी बंधूही वेगळे काही करण्याची शक्यता मुळीच नाही वांझोटे विषय घेऊन चघळत बसले तर त्यांची राजकीय कारकीर्द फार काळ चालणार नाही पण तोपर्यंत समुदायाचे अतोनात नुकसान होईल. आणि त्यांच्यामुळे चांगल्या मुस्लिमांकडे बोटं उठताहेत हे त्याहून वाईट आहे. त्यांनी सर्वसमावेशक राजकारण करून समुदायाला योग्य दिशा द्यावी असे झाले तर त्यात सर्वांचेच हित आहे.
किशोर बोराटे.
७/०२/२०१५

आपले मत व्यक्त करा