राज ठाकरेंचा बॉलीवूड वर सर्जिकल स्ट्राईक

aयुद्ध हे फक्त रणांगणातच लढले जाते असे नाही. स्वतःच्या सामर्थ्याचा धाक दाखवून शत्रूवर दबाव टाकून सुद्धा रणांगणात येण्या आधीच त्याला शरण येण्यास भाग पाडले जाते. युद्ध नीतीचे असे अनेक प्रकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले आहे शरण आलेल्याला मरण नाही मग तो शत्रू का असेना. कोणत्याही प्रकारचा विध्वंस न होता जर विरुद्ध बाजूचा तुम्हाला शरण येत असेल आणि तुमच्या अटी मान्य करून त्या पूर्ण करत असेल तर त्याच्यावर वार करण्याची आवश्यकता उरत नाही. तुम्ही युद्ध कोणत्याही प्रकारे करा, महत्त्वाचे असते त्याचा शेवट कसा झाला? ज्या मुख्य कारणांसाठी म्हणून तुम्ही युद्धाची तयारी केली किंवा युद्ध केले त्यात यश मिळणे आणि आपला विजय होणे महत्त्वाचे असते. कधी कधी मोठे युद्ध लढण्यापेक्षाही एखाद्या छोट्याश्या *सर्जिकल स्ट्राईक ने काम होते. तोच सर्जिकल स्ट्राईक राज ठाकरे यांनी बॉलीवूड वर मा. मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या सर्जिकल स्ट्राईक ने संपूर्ण भारतातील जनता खूष आहे. काही अतृप्त आत्मे भटकताहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायची आवश्यकता नाही. कारण तोडफोड झाली असती तरी हे बोंबललेच असते कायदा हातात का घेता? तोडफोड का करताय? राज्यात सरकार नाही का? मुख्यमंत्री यांच्याशी बोलायला हवे होते. याला काही अंतच नाही. भारत हा रहस्यांनी आणि चमत्कारांनी भरलेला देश आहे. इथे जे वास्तवात आहे त्याच्या पलीकडे काय आहे? हे पाहण्यात काही लोकांना जास्त रस आहे. शेवटी या सर्व प्रकारातून ज्या काही गोष्टी निष्पन्न झाले त्यासुद्धा काही कमी नाही. उरी हल्ल्यात आपले १८ जवान मारले त्यानंतर संतप्त झालेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सर्व पाकिस्तानी कलाकारांना ४८ तासात भारत सोडण्याचे आदेश दिले, अन्यथा गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला. सगळे कलाकार पाकिस्तानात चालते झाले. त्यानंतर करण जोहरचा “ये दिल है मुश्किल” हा चित्रपट मनसे प्रदर्शित होऊ देणार नाही तसेच आमच्या विरोधानंतर जर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाला तर थिएटर फोडण्यात येतील असा देखील इशारा देण्यात आला होता. त्याला घाबरून करण जोहर ने मुंबई पोलिस आयुक्तांच्याकडे धाव घेतली आणि चित्रपटाला संरक्षण मिळावे ही विनंती केली. आयुक्तांनी ती सर्वांच्यासमोर मान्य केली. पण त्याला खात्री वाटत नव्हती. पोलिसांची एकंदर परिस्थिती पाहता आणि पूर्वानुभव लक्षात घेऊन करण ने थेट दिल्ली गाठली. गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेऊन आपली व्यथा सांगितली. यासंदर्भात केंद्र सरकार काही करू शकत नाही हा प्रश्न राज्याच्या अखत्यारीतला असून आपण मा. मुख्यमंत्रीजी और राजसाहब ठाकरे से ही बात करो. असे राजनाथ यांनी आपल्या पहाडी आवाजात सांगितल्यावर करण जोहरचे डोके ठिकाण्यावर आले. दिल्लीने मदत करण्यास नकार दिल्यावर करण जोहरने राज यांच्या ऑफिस मध्ये फोन करून भेटण्याची परवानगी मागितली. त्यावर त्याला उत्तर मिळाले, राजसाहेबांची तुला भेटण्याची इच्छा नाही. दरम्यानच्या काळात फिल्म इंडस्ट्री मधील अनेकांनी प्रयत्न केले राज यांची समजूत काढण्याचे पण त्याला यश मिळाले नाही. राज यांनी त्यांना कसलाही प्रतिसाद दिला नाही. त्याही पुढे जाऊन त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आंदोलनाची रणनिती ठरवली. त्यानंतर भाजपातील काही नेत्यांशी व मंत्र्यांशी करण जोहर याने संपर्क साधला त्यांनी त्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायला सांगितले त्यानंतर मग खालील प्रमाणे घटनाक्रम झाला.

मुख्यमंत्र्यांचा सकाळी फोन आला

मिटिंगसाठी या, आपण चर्चा करू

सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मिटिंग सुरु करण जोहर, मुकेश भट्ट उपस्थित

चित्रपट रिलीज बाबत आपले मत काय? – मुख्यमंत्री याची राज यांना विचारणा

पाकिस्तानी कलाकारांना आमचा सुरुवातीपासून विरोध, आम्ही चित्रपट रिलीज होऊ देणार नाही- राज

शूटिंग पूर्ण झाले आहे, आता यातून मार्ग काढायला हवा. सणासुदीचा तमाशा नको, काहीतरी मार्ग काढा- मुख्यमंत्री यांची राज यांना विनंती

आजच्या तारखेपासून पाकिस्तानी कलाकार, गायक किंवा अजून कोणीही यांना चित्रपटसृष्टीत कायमची बंदी.त्यांना काम देणार नाही तसे लेखी पत्र आम्हाला हवे- राज

आमची तयारी आहे भविष्यात कोणत्याही पाकिस्तानी कलाकार, गायक अथवा इतर कोणी चित्रपटसृष्टीत दिसणार नाही- मुकेश भट्ट

आमचा विरोध असताना, व देशात पाकिस्तान विरोधी वातावरण असताना सुद्धा यांनी पाकिस्तानी कलाकारांना घेऊन काम केले. त्याचे त्यांनी प्रायश्चित्त घ्यावे- राज

काय करायला हवे यांनी?- मुख्यमंत्री

आता पाकिस्तानी कलाकारांना घेऊन जे चित्रपट बनवून तयार आहेत किंवा अर्धवट शूटिंग झाले आहे त्यांनी आर्मी वेलफेअर फंड मध्ये सैनिकांच्या मदतीसाठी संरक्षणमंत्री मा. मनोहर पर्रीकर यांच्याकडे ५ कोटी रु. जमा करावेत (चित्रपट चालो अगर न चालो) व तो चेक देत असतानाचा फोटो घेऊन तो प्रसिद्ध करावा. जेणेकरून जनतेला समजेल की तुम्ही फंड दिला आहे- राज

हा असला पाकिस्तानचे कलाकार घेऊन तयार केलेला चित्रपट जनता पाहणार नाही- राज

चित्रपट सुरु होण्यापूर्वी उरी हल्ल्यातील शहिद जवानांना श्रद्धांजली असा बॅनर थिएटर मध्ये दाखवावा- राज

यासर्व अटी त्यांनी मान्य केल्या. या केल्या नसत्या तर मग मात्र खळखट्याक झालेच असते हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही. पाकिस्तानी कलाकारांना इथूनपुढे आयुष्यभर कधीही काम मिळणार नाही हे या आंदोलनाचे मोठे यश आहे. याचे १००% श्रेय हे राज ठाकरेंना आहे. हे दुर्लक्षित करून कसे चालेल?

cआज सलमानला कळले असेल बॉलीवूडचा बाप कोण आहे?

हा एकप्रकारे राज ठाकरेंचा बॉलीवूड वर सर्जिकल स्ट्राईकच होता. ( राज यांनी बॉलीवूडला एकप्रकारे हेच सांगितले की *रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है.) पण हे समजायला तेवढी अक्कल हवी. मा. राजसाहेबांचा आणि देशातील देशप्रेमी जनतेचा हा विजय आहे आणि आपण याचा आनंद साजरा करायला हवा. केंद्रीय गृहमंत्री मा. राजनाथ, मा. राजसाहेब ठाकरे व मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा विषय हाताळला आहे.

click here to buy

आता जे काही हवसे-गवसे-नवसे तमाशा किंवा राडा पाहायला आसुसलेले होते आणि खळळ-खट्याक पाहायला, अगोदर का तोडफोड करता म्हणायचे आणि आता का करत नाही म्हणून विचारत आहेत. त्यांचा भ्रमनिरास झाला आहे त्यामुळे यांना मानसिक आणि वैचारिक दारिद्र्य आले आहे त्याला आमचा नाईलाज आहे. हेमंत देसाई सारखा सगळीकडचे केस पिकलेला माणूस जो स्वतःला जेष्ठ पत्रकार म्हणवून घेतो तो सुद्धा काल वाहिन्यांवर बालिश बडबड करत होता. ज्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना किंवा मोदी भक्तांना वाटते की सेटलमेंट झाली तर त्यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारावे की कितीमध्ये सेटलमेंट केली? आणि तुम्ही किती घेतले? कारण ही मिटिंग त्यांनी घडवून आणली होती. अशा पद्धतीने आरोप एकट्या राज ठाकरे यांच्यावर होऊ शकत नाहीत. राज यांना काही पेट्या, खोकी मिळाली तर मग त्याबदल्यात मुख्यमंत्र्यांना किती दलाली मिळाली? बोलताना विचार करायला हवा. भाजपातीलच फडणविसविरोधी गट व काँग्रेस-राष्ट्रवादीवाले मिडीयाला हाताशी धरून मुख्यमंत्र्यांना बदनाम करत आहे. नाव राज यांचं असलं तरी खरे टारगेट मुख्यमंत्री आहेत. हे घाणेरडे राजकारण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर ही सेटलमेंट होऊ शकते का? ते ही स्वच्छ चारित्र्याच्या मुख्यमंत्र्यासमोर हे सगळं घडू शकतं? तसं असेल तर मग भाजपाने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. म्हणजे हे सरकार तोडपाणी करतेय हे सिद्ध होईल. राज यांना सेटलमेंटच करायची असती तर मग हे एवढं करायची गरज नव्हती. फक्त एक फोन केला असता आणि सांगितलं असतं एवढे-एवढे पाठवा नाहीतर आम्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. तर करण जोहर पेट्या घेऊन स्वतः पळत आला असता.eएवढेच काय त्याने ५०% चित्रपटाचे हक्क सुद्धा दिले असते. यासर्व प्रकरणात ज्याने पुढे होऊन संघर्ष केला त्यालाच प्रश्न विचारले जात आहे. त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. (टोलनाक्याच्या वेळीही असेच झाले) राजकारणात आक्रमकता हवी पण त्याबरोबर विवेक ही हवा कुठे थांबायचे हे ही कळायला हवे. इतरही पक्ष आहेत देशात त्यांना कोणी विचारात नाही की या प्रश्नावर तुम्ही का भूमिका घेतली नाही? काँग्रेसला, राष्ट्रवादीला, भाजपाला का कोणी विचारात नाही? जे काही झाले ते जनतेने पाहिले आहे. इथून पुढे कोणताही पाकिस्तानी कलाकार भारतीय चित्रपटात कधीही दिसणार नाही. हे राज यांच्या आंदोलनाचे मुख्य यश आहे हे इथे लक्षात घ्यायला हवे. त्याचबरोबर आर्मी फंडला त्यांनी ५ कोटी द्यायला भाग पाडले. हे विसरून चालणार नाही. तो त्यांनी नाही स्विकारला तर मुख्यमंत्री निधीत जमा करा. शेवटी तो पैसा जनतेचाच आहे. अर्थात हा निधी स्विकारणार नाही असे काही संरक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे जाहीर केले नाही. आमच्या विजया वर शिक्कामोर्तब करायला आम्हाला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही. चित्रपट प्रदर्शनाचा विरोध मागे घेतला म्हणजे काही राज यांनी जाहीर केले नाही की सर्वांनी थिएटर मध्ये जाऊन चित्रपट पहाच. त्यांनी पत्रकार परिषदेत हेच सांगितले की पाकिस्तान विषयी देशात एवढा रोष असताना पाकिस्तानी कलाकार असलेला चित्रपट भारतीय देशभक्त जनता कधीच पाहणार नाही.f

मुख्यमंत्री असतील किंवा राज ठाकरे असतील त्यांना जे करावयाचे होते ते त्यांनी केले. आपण एखाद्या निर्णयाकडे कोणत्या चष्म्यातून पाहतो हे महत्त्वाचे असते. कारण त्याप्रकारचेच विचार आपल्याला मार्गदर्शन करत असतात. सगळी काही जबाबदारी राजकीय लोकांचीच आहे का? आपली काही नाही? निर्णय काहीही होऊ देत, तुम्ही यासर्वांच्यावर टीका केली म्हणजे आपली जबाबदारी संपली का? नका चित्रपट बघू. थिएटर ओस पडू द्या. कोणताही चित्रपट हिट अथवा प्लॉप करणे हे आपल्या सर्वांच्या हातात आहे. ते राज अथवा देवेंद्र फडणवीसांच्या हातात नाही. आपण जर ठाम निर्णय घेतला की नाही पाहणार हा चित्रपट, तर करण जोहर जमिनीवर येऊ शकतो. मुख्यमंत्र्यांच्यावर किंवा राज ठाकरेंच्यावर टीका करून आपली जबाबदारी संपत नाही. ज्या वाहिन्या आज टीका करत आहेत त्या भारतीयच आहेत ना? मग ते का त्या चित्रपटाची जाहिरात करतात? का त्यांना देशप्रेम नाही? वाहिन्यांवरील चर्चा पाहून आपले मत बनवणारांना हा प्रश्न का कधी पडत नाही? दुसऱ्याला दोष देता मग तुम्ही का जाहिराती करता? आपण जर चित्रपट पाहिला किंवा यांनी जाहिरात केली तर मग करण जोहरचे पैसे त्याला आपण जमा करून दिल्यागत आहे. तो आपल्यासाठी आहे, आपण त्याच्यासाठी नाही. दाखवा एकजूट आणि पाडा चित्रपट. कुणाचा पक्ष कुठलाही असु द्या शेवटी सत्य एकच की आपण भारतीय आहोत. घ्या शपथ प्रत्येकाने की हा करण जोहरचा चित्रपट असू दे अथवा आगामी शाहरुख खानचा रईस चित्रपट असू देत आम्ही पाहणार नाही.

आपले मत व्यक्त करा